ETV Bharat / bharat

बीएसएफ जवानांची बस दरीत कोसळली; चार जवानांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक - BSF Bus Accident in Budgam - BSF BUS ACCIDENT IN BUDGAM

BSF Bus Accident in Budgam : जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये बीएसएफच्या जवानांची बस खड्ड्यात कोसळली. या अपघातात 4 जवानांचा मृत्यू झाला असून 36 जवान जखमी झाल्याची माहिती आहे. यातील 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

BSF Bus Accident in Budgam
बस खड्ड्यात कोसळली (IANS)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2024, 10:17 PM IST

बडगाम BSF Bus Accident in Budgam : काश्मीरमधील बडगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये बीएसएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. बस खोल खड्ड्यात कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या अपघातात बीएसएफचे 4 जवानांचा मृत्यू झाला. तर 36 जवान जखमी झालेत. सहा जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, एसडीआरएफ बडगाम आणि इतर यंत्रणांचं संयुक्त बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 36 जखमी बीएसएफ जवानांना वाचवण्यात यश आलं. जखमींना पुढील उपचारासाठी बडगामच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

बस चालकही जखमी : सध्या बचावकार्य सुरू असून जखमींवर तातडीनं उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथकं अपघातस्थळी रवाना करण्यात आली. अपघाताच्या कारणाचा तपास अधिकारी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, घटनास्थळी स्थानिक लोक उपस्थित होते. या अपघातात बीएसएफच्या 35 जवानांशिवाय बस चालकही जखमी झाला.

अधिकाऱ्यांकडून तपास सुरू : अधिकारी या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. बस खड्ड्यात कशी कोसळली याचा शोध घेण्याचा अधिकारी प्रयत्न करत आहेत. बस वेगात जात होती का? बस चालकाचा तोल गेल्यानं बस खड्ड्यात पडली का? या सर्व बाजूंनी अधिकारी तपास करत आहेत.

हेही वाचा

  1. लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढल्या : गृहमंत्रालयानं दिली सीबीआयला खटला चालवण्यास परवानगी - Lalu Prasad Yadav Laand For Job
  2. घरातली माणसं पडली आजारी; जादूटोणा करत असल्याच्या संशयातून मुलासह सुनेला जोरदार मारहाण - BEATING ON WITCHCRAFT
  3. तिरुपती लाडूच्या तुपात जनावरांची चरबी असल्याची सरकारी लॅबकडून पुष्टी, नेमकी भेसळ कशी झाली? - tirupati laddu news

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.