नागपूर Amit Shah Maharashtra Tour : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. 24 आणि 25 सप्टेंबरला ते महाराष्ट्राचा दौरा करणार, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते नागपूर विमानतळावर बोलत होते.
24 आणि 25 सप्टेंबर रोजी अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यात छत्रपती संभाजीनगर येथं महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. दोन दिवसीय दौऱ्यात अमित शाह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे.
बावनकुळेंकडून नितेश राणेंची पाठराखण : नितेश राणेंचे वक्तव्य हे राज्यातील मुस्लिमांबाबत आणि देशातील नसल्याचं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. "या देशामध्ये राहून काही मुस्लिम पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलत आहे. जे मुस्लिम भारतात प्रेमानं राहतात त्यांच्याबद्दल नितेश राणे बोलले नाहीत तर भारताबद्दल जे विरोधी मत व्यक्त करतात त्यांच्याबद्दल राणे बोलले," असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
ठाकरेंना बेईमान काँग्रेस कळली : "उद्धव ठाकरे यांना कॉंग्रेस किती बेईमान आहे, हे आता कळलं असेल," असा टोला बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. "महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी लढाई सुरू आहे. काँग्रेस आणि शरद पवारांना जेवढा उद्धव ठाकरे यांचा वापर करायचा तेवढा केला. मुख्यमंत्री कोण हे जाहीर करावं लागेल या भीतीनं महाविकास आघाडीचे मेळावे बंद झाले आहेत," असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. "ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, परंतु कॉंग्रेस आणि शरद पवार त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नसल्याचं ते म्हणाले.
महायुतीनं दिली ग्रामपंचायतींना बळकटी : ग्रामपंचायतींचं आर्थिक बळकटीकरण व्हावं, यासाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला. ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या विकासकामांची मर्यादा 3 लाखावरून 15 लाख केली. यामुळं ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळेल.
हेही वाचा
- साखर नियंत्रण कायद्यात होणार दुरुस्त्या; 23 सप्टेंबरपर्यंत केंद्रानं हरकती मागवल्या, साखरपट्ट्यात संमिश्र प्रतिक्रिया - Sugar Factories Control Act
- कोपरगाव गोळीबार प्रकरणी अजित पवार गटाच्या आमदाराची चौकशी करा, भाजपाची मागणी - Kopargaon Firing Case
- जमिनीत अचानक खड्डा पडून कोसळला ट्रक; पाहा सीसीटीव्ही, नेमकी भानगड काय? - Pune Truck Collapsed