ETV Bharat / state

कोपरगाव गोळीबार प्रकरणी अजित पवार गटाच्या आमदाराची चौकशी करा, भाजपाची मागणी - Kopargaon Firing Case - KOPARGAON FIRING CASE

Kopargaon Firing Case : कोपरगाव शहरात प्रचंड वर्दळ असणाऱ्या परिसरात गोळीबाराची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत चौकशीची मागणी केलीय.

Kopargaon Firing Case
अजित पवार गटाच्या आमदाराची चौकशीची मागणी (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2024, 9:20 PM IST

कोपरगाव Kopargaon Firing Case : कोपरगाव शहरात पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर नवश्या मारुती मंदिरानजीक गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी भरदिवसा साडेचार वाजता गोळीबाराची घटना घडली. या घटनेत गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे शहरात घबराटीचं वातावरण पसरलंय. या गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे स्विय सहाय्यक यांच्या चौकशीची मागणी भाजपा युवा नेते विवेक कोल्हे यांनी केलीय.

आमदार काळेंवर गंभीर आरोप : तन्वीर रंगरेज यांच्यावर गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात तो गंभीर जखमी झाला. जखमी रंगरेजला उपचारासाठी नेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत तो आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे स्वीय सहकारी जोशी यांचं नाव घेत असल्याचं दिसून आलं. त्यामुळं आता या घटनेला आता राजकीय वळण लागलं असून आमदार काळे यांचे राजकीय शत्रू असलेले भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी आज थेट कोपरगाव शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. आमदार काळे यांच्यासह आरोपी नाजीम शेख यांचे काही फोटो व स्टेटस दाखवत आमदार काळेंवर गंभीर आरोप त्यांनी केलाय. आमदार आशुतोष काळे यांना राजकीय आश्रय असल्यानं अशा आरोपींना पाठबळ देत असल्यानं त्यांची व संबंधितांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विवेक कोल्हे यांनी केली.

भाजपा युवा नेते विवेक कोल्हे (Source - ETV Bharat Reporter)

राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करावी : पोलिसांनी संबंधित गोळीबार प्रकरणात आठ आरोपींना अटक केली असून हा गोळीबार टोळीयुद्धातून झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र, अवैध व्यवसायातून हा प्रकार घडला असल्यानं राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आलीय.

हेही वाचा

  1. जमिनीत अचानक खड्डा पडून कोसळला ट्रक; पाहा सीसीटीव्ही, नेमकी भानगड काय? - Pune Truck Collapsed
  2. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिडको देणार परवडणारी घरं; नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शिरसाट काय म्हणाले? - Sanjay Shirsat CIDCO President
  3. तीन मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न; पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या, दोघे फरार - Nashik Crime

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.