VIDEO ..अन् सनी देओलला पाहून शेतकरी भारावला, बैलगाडी थांबवून हात मिळवले; पाहा व्हिडीओ - viral video
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर : सिने अभिनेता भेटल्यावर कुठल्याही चाहत्याला आनंद होतो. परंतु अचानक आपला आवडता हिरो आपल्यासमोर उभा राहिल्यावर झालेला आनंद काही वेगळाच असतो. असाच काहीसा प्रकार भाऊसाहेब कार्ले या शेतकऱ्यांबरोबर घडला. अहमदनगरच्या चास येथील भाऊसाहेब कार्ले या शेतकऱ्याची अभिनेता सनी देओल यांनी रस्त्यात भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. चास येथील भाऊसाहेब कार्ले हे आपल्या शेतातील काम आटोपून घराकडे निघाले असता, रस्त्यात सनी देओल यांनी त्यांची बैलगाडी थांबवली. शेतकऱ्याने आपण सनी देओल सारखे दिसतात असे म्हंटल्यावर सनी देओल हसायला लागला. त्याचा आवाज ऐकून शेतकऱ्याला ते सनी देओलच असल्याची खात्री झाली. त्यांच्यात बोलणे सुरू झाले. एक सामान्य शेतकरी आपल्याला ओळखतो असे पाहिल्यावर सनी देओलच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य आले. त्या शेतकऱ्याला देखील मनस्वी आनंद झाला.