Siddaramaiah Slipped In The Car: कारमध्ये बसताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या घसरले, पाहा व्हिडिओ - कारमध्ये बसताना कर्नाटकचे सिद्धरामय्या घसरे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 29, 2023, 4:54 PM IST

कर्नाटक : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या निवडणूक प्रचारासाठी दौऱ्यावर आले होते. त्या दरम्यान, उपस्थितांना गाडीत बसताना ते नमस्कार करत होते. त्याच दरम्यान त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडणार इतक्यात त्यांच्या सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखून त्यांना गाडीत बसवले. सथ्या या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सिद्धरामय्या हेलिकॉप्टरने निवडणूक प्रचारासाठी कुडलिगी येथे आले होते. हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर ते उपस्थित लोकांचे अभिवादन स्वीकारत कारमध्ये बसले त्यावेळी ही घटना घडली. त्यानंतर काही वेळाने सिद्धरामय्या कार्यक्रमस्थळी रवाना झाले. दरम्यान, यावर सिद्धरामय्या यांनी याबाबत ट्विट करत स्पष्टीकरणही दिले आहे. ते म्हणाले की, 'कारमध्ये बसताना माझा पाय घसरला, कोणतही इजा झालेली नाही. कोणालाही घाबरण्याची गरज नाही, मी व्यवस्थित आहे असही ते म्हणाले आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.