ETV Bharat special story on garba : घरच्या घरी शिका दांडिया, गरबाच्या स्टेप्स; पाहा ईटीव्ही भारतची विशेष स्टोरी...
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक ETV Bharat special story on garba : गुजरात राज्याचा गरबा, दांडिया हा पारंपरिक खेळ असला तरी नाशिकमध्ये सर्वांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. सध्या ठिकठिकाणी गरबा, दांडिया प्रशिक्षण वर्ग सुरू झाल्याचं बघायला मिळतंय. यात 5 वर्ष ते 70 वर्ष वयाच्या महिला, मुले, युवती यांचा समावेश आहे. तसंच पारंपारिक दांडिया, गरबासह स्टायलिश स्टेप्स शिकण्याकडे गरबा प्रेमींचा कल दिसून येतोय. यंदा गरबा प्रेमींकडून विशेषतः तरुणींकडून लेझीम गरब्यासह दांडिया सिक्स, दोडिया टेन, दोडिया ट्वेंटी गरबा प्रकारात एक ताली, दोन ताली, तीन ताली, सनेडो, पोपट, ठकडी, धोडीयो यांच्यासह काठियावाड स्टाईलला अधिक पसंती मिळत आहे. दरम्यान, याच निमित्ताने ई टीव्ही भारत आयोजित कार्यशाळेत तुम्ही घरच्या घरी दांडिया, गरबा कसे शिकू शकता, याबाबत नृत्य प्रशिक्षक सृष्टी तेजाळे आपल्याला प्रशिक्षण देणार आहेत...