Mumbai Marathon : भारतीय पूर्ण मॅरेथॉन विजेते गोपी टी व मान सिंग यांच्यासोबत विजयानंतर 'ईटीव्ही भारत'ने साधलेला संवाद, पाहा
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये एलिट गटात इथोपिया धावकांचा दबदबा राहिला असला तरी सुद्धा भारतीय गटामध्ये सुद्धा भारतीय धावपटूंनी चांगली कामगिरी केली आहे. भारतीय गटामध्ये पूर्ण मॅरेथॉनमध्ये गोपी टी याने हे अंतर २ तास १६ मिनिटे ४१ सेकंद हे पूर्ण करत पहिल्या क्रमांकावर राहिला. तर मान सिंग हा २ तास १६ मिनिटे ५८ सेकंद ने हे अंतर पूर्ण केल्यावर तो दुसऱ्या स्थानी राहिला आहे. तर मराठमोला कालिदास हिरावे याने पहिल्यांदाच या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला असून त्याने हे अंतर २ तास १९ मिनिटे ५४ सेकंदामध्ये पार करत तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला. गोपी टी हा तीन वर्षाच्या अंतरानंतर मॅरेथॉन स्पर्धा धावला आहे. त्या कारणास्तव फार मोठ मानसिक तणाव व दडपण त्याच्यावर होते. तरी सुद्धा स्वतःच्या हिमतीवर व आत्मविश्वासावर १८ डिग्री तापमानात व मुंबईच्या वातावरणात धावत त्याने ही शर्यत पूर्ण केली. त्याचबरोबर मान सिंग हा पहिल्यांदा ही शर्यत धावला व त्याने सुद्धा त्याचे सर्वोत्कृष्ट टाइमिंग देत ही शर्यत दुसऱ्या क्रमांकावर पूर्ण केली आहे. गोपी टी व मान सिंग यांच्याशी ईटीव्ही भारतने साधलेला संवाद..
शेतकऱ्यांच्या मुलींची मुंबई मॅरेथॉनमध्ये बाजी : शेती आणि त्यातून उत्पादनावर शेतकरी उपजीविका करतो. आजारी पडला तर डॉक्टरकडे जाणे दुरापास्तच असते. डॉक्टरांचा सल्ला घेऊन आहार घेण्याचा विचार तर दूरची गोष्ट. अशा परिस्थितीत मुंबई मॅरेथॉन मध्ये औरंगाबाद येथील शेतकऱ्यांच्या मुलींनी मुंबईत धावताना बाजी मारली. औरंगाबादच्या पाच पैकी टॉप टेनमध्ये बाबूलगांवमधील ३ मुलींनी बाजी मारली. तर एकीने दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.कोविड नंतर मुंबईत प्रथमच मुंबई मॅरेथॉन झाले. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील अनेक मुली या मॅरेथॉनमध्ये धावल्या. खेडेगावातून आलेल्या या मुलींनी मुंबईकरांचा अक्षरशः दम काढला. २१ आणि १० किलोमीटरच्या स्पर्धेत शीतल जाधव आणि अमृता गायकवाड यांनी अनुक्रमे दोन आणि तीन क्रमांक पटकावला. तर गीतांजली भोसले हिने टॉप टेनमध्ये ५ वा क्रमांक मिळवला. अवघ्या ४५ मिनिटांत तिने हे अंतर पार केले.