ED Raids On Gold Trader : १३ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; सोने व्यापाऱ्याची 315 कोटीची मालमत्ता जप्त - सोने व्यापाऱ्यावर ईडीची कारवाई
🎬 Watch Now: Feature Video


Published : Oct 15, 2023, 4:37 PM IST
ठाणे : ED Raids On Gold Trader : ईडीकडून ठाणे, जळगाव, मुंबई, राजस्थानसह १३ ठिकाणी छापेमारी करत सोने व्यापारी राजमल लखीचंद यांची ३१५ हून अधिक कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई तब्बल 72 तास सुरू होती. (Seizure of Gold Traders Property) जळगाव, ठाणे, राजस्थान अशा विविध ठिकाणी छापेमारी करत ही कारवाई करण्यात आलेली आहे. (Bank Fraud by Gold Merchant) एसबीआय बँकेची 350 कोटींपेक्षा जास्तीची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई केली गेली. याच प्रकरणांमध्ये सुरुवातीला सीबीआयने तीन एफआयआर दाखल केले होते. याचाच आधारे तपासात ईडीने ही संपूर्ण कारवाई केल्याचे समोर येतं आहे. खोटी कागदपत्रे, खरेदी विक्री चलन, बनावट कंपन्या, बनावट पदाधिकारी बनवून बँकेची फसवणूक केल्याचं हे संपूर्ण प्रकरण आहे. मनीष जैन आणि त्यांची राजमल लखीचंद एंटरप्राइजेस यांच्या मालमत्तेवरती ईडीने छापेमारी करत कारवाई केली.