Dry Fruit Garland To Sharad Pawar : शरद पवारांच्या चाहत्याने त्यांना दिला 21 किलोचा 'ड्रायफ्रुट'चा हार - शरद पवारांना ड्रायफ्रुटचा हार
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 10, 2023, 4:39 PM IST
पुणे Dry Fruit Garland To Sharad Pawar : सध्या सर्वत्र दिवाळी सणाचा उत्साह असून बाजारपेठा लोकांची घरं दिव्यांनी उजळून निघत आहेत. सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय व्यक्ती एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत. (Diwali 2023) अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिवाळीच्या निमित्तानं भेटण्यासाठी राज्यभरातून पदाधिकारी तसंच कार्यकर्ते हे येत आहेत. (NCP leader Shrikant Patil) तसंच त्यांना शुभेच्छा देखील देत आहेत. अशातच आज शरद पवार हे पुण्यातील मोदीबाग येथे असताना पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत पाटील यांनी दिवाळी निमित्त खास शरद पवार यांच्यासाठी 21 किलोचा 'ड्रायफ्रुट'चा हार बनवून आणला होता आणि तो त्यांना देण्यात आला. (Diwali gift to Sharad Pawar)
हारामधील ड्रायफ्रुट गरीब मुलांना वितरित : आजपर्यंत शरद पवारांचा सत्कार करताना पुष्पगुच्छ (Happy Diwali to Sharad Pawar) तसंच विविध प्रकारचे हार दिले जायचे; पण यंदाच्या दिवाळीत काहीतरी वेगळं करायचं होतं आणि कल्पना सुचली की 'ड्रायफ्रुट'चा हार बनवावा. जवळपास 18 दिवस मेहनत घेऊन 21 किलो वजनाचा 'ड्रायफ्रुट'चा हार बनविण्यात आला. तो हार आज पवारांना देण्यात आला. या हारमध्ये खजूर, काजू, बदाम, बेदाणे, अंजीर लावण्यात आले आहेत आणि हा सर्व सुका मेवा बारामती येथील गरीब मुलांना देण्यात येणार आहे.