Dhangar Reservation : आरक्षणावरून धनगर समाज आक्रमक; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे फोडले कार्यालय - शिक्षक भरती
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 11, 2023, 10:10 PM IST
सोलापूर Dhangar Reservation : धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. आंदोलकांनी सोलापूरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मागील दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळल्याचे प्रकरण ताजे असतानाच, आज दुपारी धनगर समाजाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेत गोंधळ केलाय. बिंदू नामावलीच्या नावाखाली धनगरांच्या आरक्षणाला धक्का लावला जातोय, अशी माहिती आंदोलकांनी दिलीय. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावली तयार केलीयं. ही नामावली पूर्ण झाली असून, धनगर समाजाचे साडेतीन टक्के आरक्षण वगळून शिक्षक भरती केली जात आहे. धनगर समाजाला शिक्षक भरतीत साडेतीन टक्के आरक्षण मिळावे अशी मागणीही त्यांनी केलीयं. दरम्यान पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलंय.
धनगर समाजातील शरणू हांडे, सोमलिंगग घोडके, धनाजी विष्णू गडदे, अंकुश केरपप्पा गरांडे हे कार्यकर्ते दुपारच्या सुमारास अचानक जिल्हा परिषदेत आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यशवंतराव चव्हाण सभागृहात अधिकाऱ्यांची समन्वय सभा घेत होत्या. अचानक हे कार्यकर्ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात घुसले आणि आतील सर्व खुर्च्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. कार्यालयातील खिडक्यांच्या काचाही फोडल्या.