मुंबई - अभिनेता शाहिद कपूर चित्रपटांमध्ये जबरदस्त ॲक्शन करण्यासाठी ओळखला जातो. नवीन वर्षात त्याच्या मोस्ट अवेटेड 'देवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. आता शाहिद कपूर स्टारर 'देवा'चं 5 जानेवारी रोजी टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा टीझर झी स्टुडिओ आणि रॉय कपूर फिल्म्सनं रिलीज केला आहे. देवाच्या टीझरच्या सुरुवातीला शाहिद कपूर डान्स करताना दिसत आहे. डान्सिंग स्टेप्स दाखवल्यानंतर तो त्याच्या मिशनवर जातो. एका केसच्या संदर्भात तो अनेकांना पकडतो. टीझरमध्ये शाहिद हा जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये शाहिद हा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
'देवा'चा टीझर झाला रिलीज : दरम्यान टीझरच्या शेवटी एक रंजक ओळ ऐकायला मिळते ती म्हणजे, 'आला रे आला देवा आला.' 'देवा' चित्रपटात पूजा हेगडे पत्रकाराच्या भूमिकेत आहे. याशिवाय प्रवेश राणा, कुब्बरा सैत आणि पावेल गुलाटी यांच्या देखील चित्रपटात महत्वाच्या भूमिका असणार आहेत. तसेच टीझरमध्ये पूजा हेगडेची एक छोटीशी झलक पाहायला मिळाली आहे. ती स्टेजवर शाहिदबरोबर डान्स करताना दिसत आहे. मात्र तिचा यात स्पष्ट चेहरा दिसत नाही. 'देवा' चित्रपटाचा ट्रेलर आता अनेक यूजर्सला पसंत आला आहेत. हा टीझर पाहून अनेकजण शाहिदचं कौतुक करत आहेत. या चित्रपटामध्ये शाहिदचा अनोखा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
या दिवशी 'देवा' चित्रपटगृहात होईल दाखल : चाहते गेल्या वर्षभरापासून शाहिद कपूरच्या बहुप्रतीक्षित 'देवा' या चित्रपटाच्या रिलीजची पाहत आहेत. आता या चित्रपटाच्या रिलीजला फारसा वेळ उरलेला नाही. टीझर व्हिडिओसह, निर्मात्यांनी सांगितलं आहे की, हा चित्रपट 31 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होईल. आता शाहिदचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार स्टारर 'स्काय फोर्स'ला टक्कर देईल. दरम्यान शादिद कपूरचा हा आगामी चित्रपट 85 कोटीच्या बजेटमध्ये निर्मित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर आहेत. 'देवा' चित्रपटाचं दिग्दर्शन रोशन अँड्र्यूज यांनी केलंय. हा चित्रपट झी स्टुडिओज आणि रॉय कपूर फिल्म्स प्रस्तूत करत आहे.
हेही वाचा :