हैदराबाद- चीनमध्ये मानवी मेटाप्युमोव्हायरसचा (HMPV) संसर्ग वेगानं वाढल्यानंतर भारतातदेखील रुग्ण दिसून येत आहेत. देशात सर्वप्रथम बंगळुरूमध्ये (HMPV virus cases in India) दोन मुलांना एचएमपीव्हीची लागण झाल्याचं निदान झाले. त्यानंतर गुजरातमधील अहमदाबादमध्ये 2 महिन्यांच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तामिळनाडूमध्ये एचएमपीव्हीचे दोन रुग्ण दिसून आले आहेत.
तामिळनाडूमधील चेन्नईतील एक आणि सालेममधील एकाला एचएमपीव्हीची लागण झाली. या रुग्णामध्ये सर्दी आणि तापाची लक्षणे आहेत. देशात कोरोनानंतर पुन्हा विषाणुचे रुग्ण दिसून येत असल्यानं चिंता व्यक्त होत असताना जागतिक आरोग्य संघटनेचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी एक्स मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, " एचएमपीव्हबद्दल काळजी करण्यासारखे काही या विषाणूनं केवळ सौम्य संसर्ग होतो. त्यात घाबरण्यासारखे काही नाही. मास्क घालणे, हात धुणे, गर्दी टाळणे ही काळजी घ्यावी. गंभीर लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा," असे प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे. श्वसनातून होणाऱ्या एकूण आजारापैकी सुमारे ३ टक्के एचएमपीव्हीचा वाटा आहे, याकडं त्यांनी लक्ष वेधलं.
महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं काय म्हटलं? केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना चीन तसेच शेजारील देशांमधील परिस्थितीवर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्रामने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात कोणत्याही विषाणूजन्य संसर्गामध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही, अशी माहिती नड्डा यांनी दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एचएमपीव्ही विषाणूमुळे घाबरून जाऊ नका, असे जनतेला आवाहन केले. याबाबतची नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना माहिती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असताना अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावे, असे आवाहन केले.
- एचएमपीव्हीची लागण झालेल्या रुग्णात काय असतात लक्षणे?एचएमपीव्हीची लागण झालेल्या रुग्णामध्ये कोविड-19 सारखीच असतात. या विषाणुचा लहान मुलांना लवकर संसर्ग होतो. रुग्णामध्ये खोकला, सौम्य ताप, नाक वाहणे आणि घसा खवखवणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. काही प्रकरणांमध्ये विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर गंभीर लक्षणे दिसू शकतात. रुग्णाला श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो.
हेही वाचा-