ETV Bharat / state

चिथावणीखोर वक्तव्य प्रकरण ; मनोज जरांगेंना अटक करा, ओबीसी नेते आक्रमक; पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन - SANTOSH DESHMUKH MURDER CASE

सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात मनोज जरांगे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याविरोधात ओबीसी समाजातील नेते आक्रमक झाले आहेत.

Santosh Deshmukh Murder Case
ओबीसी आंदोलक (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2025, 9:00 AM IST

पुणे : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. मराठा समजाचे विविध शहरात मोर्चा काढले जात आहेत. अश्यातच परभणी इथल्या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या चिथावणीखोर विधानावर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. पुण्यातील शिवाजीनगर पोली ठाण्याच्या बाहेर आंदोलन करत या नेत्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

Santosh Deshmukh Murder Case
ओबीसी आंदोलक (Reporter)

मनोज जरांगेंच्या अटकेसाठी ओबीसी नेत्यांचं पुण्यात आंदोलन : पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर सोमवारी ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी बाळासाहेब सानप म्हणाले की, "मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जातीयवादी विधान केलं आहे. ओबीसी आणि वंजारी समाजाला ज्या पद्धतीनं टार्गेट केलं जातं आहे, ते चुकीचं आहे. मनोज जरांगे यांच्याकडून घरात घुसण्याची भाषा करण्यात येत आहे. कोणाच्या घरात घुसून काय करणार आहे, हे त्यांनी सांगावं. त्यांच्या या वक्तव्याचा निषेधार्थ आता संपूर्ण राज्यभर मनोज जरांगे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे."

मनोज जरांगे यांना आवर घालावा : "ओबीसी समाजाचा घटक असलेल्या वंजारी समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात बसवण्यात येत आहे. ज्या पद्धतीनं एखाद्या समाजाविरोधात चिथावणीखोर भाषा करण्यात येत आहे. त्यांच्या घरात घुसण्याची भाषा करण्यात येत आहे. त्या विरोधात राज्याच्या गृह खात्यानं तत्काळ पावलं उचलून जातीय सलोखा राखावा. जातीयवादी मनोज जरांगे यांना आवर घालावा. त्यांनी जी काही चिथावणीखोर वक्तव्यं केली आहेत, त्याबाबत गुन्हा दाखल करावा," अशी मागणी यावेळी बाळासाहेब सानप यांनी केली.

हेही वाचा :

  1. आरोप करायचेत त्यांना करू द्या, चौकशी होईपर्यंत मी बोलणं उचित नाही - धनंजय मुंडे
  2. मनोज जरांगेंची चिथावणीखोर भाषा; ओबीसी नेते आक्रमक, लक्ष्मण हाकेंनी दिला 'हा' इशारा
  3. संतोष देशमुख हत्याकांड : सुरेश धस यांचा मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाले, 'आका वापरायचा 17 मोबाईल फोन'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.