ETV Bharat / entertainment

लग्नाच्या वरातीपासून ते सात फेऱ्यांपर्यंत, भावाच्या लग्नात थिरकली प्रियांका चोप्रा - PRIYANKA CHOPRA BROTHER WEDDING

प्रियांका चोप्रानं तिचा भाऊ सिद्धार्थच्या लग्नाचे नवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्याची एक झलक इथं पाहू शकता.

PRIYANKA CHOPRA BROTHER WEDDING
भावाच्या लग्नात थिरकली प्रियांका चोप्रा ((IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 8, 2025, 8:08 PM IST

मुंबई - ग्लोबल स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लगीन घाईत गुंतली आहे. तिचा रॉकस्टार पती निक जोनास त्याच्या कुटुंबासह या लग्नाला हजर राहिला आणि भारतीय विवाह सोहळ्याचा आनंद घेताना दिसला. आज, ८ फेब्रुवारी रोजी, प्रियांकाने तिच्या भावाच्या लग्नाचे नवीनतम फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शनिवारी प्रियांकानं तिच्या इंस्टाग्रामवर सिद्धार्थच्या लग्नाच्या सात फेऱ्यांपर्यंतची झलक शेअर केली. पोस्टच्या पहिल्या स्लाईडमध्ये, प्रियांकानं सिद्धार्थच्या जयमालाची झलक दाखवली आहे. यामध्ये वधू-वरांवर फुलांचा वर्षाव होताना दिसत आहे. लग्नाचा एक टप्पा पार केल्यानंतर हे जोडपं खूप आनंदी दिसत आहे.

दुसऱ्या स्लाईडमध्ये, वधू आणि वराच्या कुटुंबाचा एक खास फोटो दिसत आहे. तिसऱ्या स्लाईडमध्ये वधू आणि वराची एन्ट्री दाखवली आहे, ज्यामध्ये प्रियांका तिच्या भावाला स्टेजवर घेऊन जाताना दिसत आहे. यामध्ये ती आपल्या होणाऱ्या भावजईला मिठी मारताना दिसत आहे.

पुढील काही स्लाईड्समध्ये लग्नाच्या पार्टीतील डान्स आणि इतर लग्न विधी दाखवल्या आहेत. एका व्हिडिओमध्ये ती तिच्या भावासाठी गतबंधनाचा विधी करताना दिसत आहे. काही फोटोमध्ये प्रियांकानं तिच्या भावाचे आणि वहिनीचे खास फोटोही जोडले आहेत. एका फोटोमध्ये प्रियांका तिचा पती निक आणि तिचा भाऊ आणि वहिनीसोबत पोज देताना दिसत आहे.

शेवटच्या फोटोंमध्ये प्रियांका आणि निक जोनास कुटुंबाच्या फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना, प्रियांकानं कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'प्रेम, हास्य, सूर्यप्रकाश आणि आनंदाने भरलेल्या आयुष्यासाठी.' अभिनेत्रीने ही पोस्ट सिडनीज वेडिंग या हॅशटॅगसह जोडली आहे.

याआधी प्रियांकानं तिच्या भावाचे लग्नापूर्वीचे फोटोही शेअर केले होते. अभिनेत्रीने सिद्धार्थच्या हळदी, मेहंदी आणि संगीताचे सुंदर क्षण तिच्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. या झलकांवरून असा अंदाज लावता येतो की अभिनेत्री आणि तिच्या रॉकस्टार पतीने या लग्नाचा खूप आनंद घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.