नाशिक : इगतपुरी तालुक्यात शिक्षकाच्या मदतीनं मुख्याध्यापकानी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी मुख्याध्यापकासह शिक्षकाला अटक केली असून, मुख्याध्यापकाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.
शिक्षकाच्या मदतीनं अल्पवयीन मुलीवर अत्याचार : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली. वर्गशिक्षकानं मुख्याध्यापकाच्या सांगण्यावरून शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला शुक्रवारी दुपारी मुख्याध्यापकाच्या घरी नेलं. यानंतर मुख्याध्यापकानं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून पीडित मुलीला घरी पाठवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल : पीडित मुलीला अत्याचारामुळं त्रास होत असल्यानं तिनं ही बाब मैत्रिणींना सांगितली. त्यानंतर मैत्रिणीनं पीडित मुलीच्या घरी माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्याध्यापकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करत मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षक यांना अटक केली. या घटनेनंतर इगतपुरी तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे.
आरोपी अटकेत : "अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. याआधी मुख्याध्यापकानं इतर कोणत्या विद्यार्थिनीचं शोषण केलं आहे का? याचाही तपास आम्ही करत आहोत," अशी माहिती पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर यांनी दिली.
दोन मुलींचे मृतदेह आढळले : 3 फेब्रुवारीला इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरातील शेणवड बुद्रुक इथल्या विहिरीमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली होती. या दोन्ही मुलींनी आत्महत्या केली की, त्यांच्यासोबत घातपात झाला? याबाबत अद्याप तपास सुरू आहे. याबाबत घोटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोन्ही घटनांनी इगतपुरी शहर हादरलंय.
हेही वाचा :
- मेळघाटात बहरला स्थलांतरित चक्रवाक पक्ष्यांचा मेळा, कोरकूंना वाटते ही तर पक्ष्यांची "घुंगडू हाटी"
- राज्यात भाजपाची 1,02,00000 सदस्यांची नोंदणी, दीड कोटीहून अधिक नोंदणी होणार, रवींद्र चव्हाण यांची माहिती
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग अन् भद्रा मारोतीचं दर्शन; म्हणाल्या...