अहमदाबाद- भारतीय तटरक्षक दलाचे अत्याधुनिक असे ध्रुव हेलिकॉप्टर पोरबंदरमध्ये कोसळल्यानं मोठी दुर्घटना ( Helicopter crash in Porbandar ) घडली आहे. ही दुर्घटना पोरबंदरमधील कोस्ट गार्ड एअर एन्क्लेव्हमध्ये घडली. अपघातात दोन वैमानिकासह एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं दुर्घटना घडली. झाला. विमानात दोन वैमानिक आणि अन्य तीन जण होते. विमान दुर्घटनेबाबत भारतीय तटरक्षक दलाकडून तपास करण्यात येत आहे.
काय आहे एएलएच ध्रुवचं वैशिष्ट्य?- ध्रुव हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केलेले हेलिकॉप्टर आहे. हे हेलिकॉप्टर संरक्षण दल आणि नागरी दोन्ही क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित करण्यात आलं आहे. ध्रुव हे संरक्षण दलाकडं 2002 पासून सेवेत आहे. त्याचा वापर वाहतूक, आपत्कालीन परिस्थिती शोधमोहीम, पाणबुडीविरोधी युद्ध यासह विविध मोहिमांसाठी करण्यात येतो. याची उपयुक्तता लक्षात घेऊन नेपाळ, मॉरिशस आणि मालदीवसह अनेक देशांमध्ये हेलिकॉप्टरची निर्यातदेखील करण्यात आली आहे.
हेही वाचा-