संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजघाटाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याचे केले अनावरण
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 10, 2023, 4:16 PM IST
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीतील राजघाटाजवळ महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी ते म्हणाले की, "गांधी आजही प्रासंगिक आहेत आणि त्यांचा महाकाय पुतळा बसवणे हे कौतुकास्पद पाऊल आहे. महात्मा गांधींनी जगभरातील लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींच्या आदर्शांना आपल्या जीवनात मूर्त रूप देऊन देशवासीयांची सेवा केली आहे."राजनाथ सिंह म्हणाले की, 'माझ्या मते यापूर्वीची सर्व सरकारे महात्मा गांधींचे विचारधारा विसरले आहेत. यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो. पंतप्रधान मोदींनीच महात्मा गांधींची विचारधारा आपल्या जीवनात अंमलात आणून जनतेची सेवा केली. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिले काम केले ते म्हणजे 'स्वच्छ भारत'. महात्मा गांधींनीच स्वच्छतेबद्दल सांगितले आहे.