Akola Tree Accident : पारस दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरू; वारसांना मुख्यमंत्री निधीमधून मदत मिळणार - देवेंद्र फडणवीस - पारस दुर्घटनेतील जखमी
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर : एका धार्मिक समारंभासाठी अकोला जिल्ह्यातील पारस येथे लोक एकत्र आलेले होते. तेव्हा शेडवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त वेदनादायी आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असून जखमींवर वेळेत उपचार व्हावे यासाठी ते समन्वय ठेवून आहेत. सातत्याने संपर्कात असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते नागपुरात बोलत होते. टिनाच्या शेडवरती झाड कोसळून सात भाविकांचा मृत्यू झाला. तसेच 37 जण जखमी झाले आहेत. जे जखमी झालेले आहेत त्यांना चांगला औषध उपचार मिळावा यासाठी अकोलाच्या चांगल्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे. त्यांचा संपूर्ण उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल, तर ज्यांचा मृत्यू झालेला आहे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून त्यांच्या परिवाराला सहाय्यता निधी दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. या अवकाळी पावसाचा राज्यातील अनेक भागांना फटका बसलेला आहे. त्यामुळे हजारो हेक्टर शेत जमिनीवरील पीक मातीमोल झाले आहे. या संदर्भात पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक अहवाल आमच्याकडे आलेले आहे. अंतिम अहवाल आमच्याकडे आला की, मदतीची घोषणा केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.