thumbnail

By

Published : Jul 19, 2023, 4:25 PM IST

Updated : Jul 19, 2023, 5:46 PM IST

ETV Bharat / Videos

Ahmednagar News: अबब.. जन्माला आले चक्क दोन तोंडाचे वासरु, पाहण्यासाठी नागरिकांनी केली एकच गर्दी

अहमदनगर : जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या दुसऱ्या वेताच्या गाईने चक्क दोन तोंड असलेल्या वासराला जन्म दिला आहे. या वासराची दोन तोंडे एकमेकांपासून विरुध्द दिशेला असून या वासराला चार कान, एक नाक, दोन जबडे आहेत. ही माहिती वार्‍यासारखी परिसरात पसरली. गावातील लोक या वासराला पाहण्यासाठी गर्दी करत होते. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावातील प्रगतशील शेतकरी संजय अण्णासाहेब म्हसे यांच्या दुसऱ्या वेताच्या जर्शी गायने या वासराला जन्म दिला आहे. हे वासरु जन्मानंतर अशक्त असल्याने ते जास्त काळ जगू शकेल का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या वासराला दोन तोंडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत. त्यामुळे आधीकच्या डोक्याचे वजन वासरु पेलू शकेल का? तसेच दोन डोक्यांचे वजन जास्त झाल्यामुळे सध्यातरी वासराला उभे राहण्यास अडचण येत आहे. अनुवांशिक विकारांमुळे तसेच हवामान आणि आईच्या जीन्समध्ये गर्भधारणा काळात झालेल्या उलथापालथीमुळे असे वासरु जन्माला येऊ शकते असे मत, जनावरांचे डॉ. रंगणाथ गिते यांनी सांगितले आहे.

Last Updated : Jul 19, 2023, 5:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.