विद्यार्थीनींचा अनोखा विक्रम: तब्बल 10 हजार 750 कोरफड रोपांची लागवड, इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद - Aloe vera Cultivation - ALOE VERA CULTIVATION
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 22, 2024, 7:48 AM IST
पुणे Aloe vera Cultivation : कात्रज येथील सरहद महाविद्यालयामधील 1518 विद्यार्थिनींनी एकाच दिवशी तब्बल 10 हजार 750 कोरफड रोपांची लागवड करून विक्रम केलाय. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. शाश्वत विकास साधायचा असेल तर पर्यावरण पूरक जीवन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजावा यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी. केवळ बोलण्यापेक्षा आणि शिकण्यापेक्षा त्यांच्या हातून कृती घडावी, या उद्देशानं या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं, असं सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर म्हणाले. तसंच कारगिलमधील 'सुरु व्हॅली' येथे निसर्गोपचारावर आधारित उपक्रम सरहद संस्थेच्या वतीनं सुरू आहेत. त्या उपक्रमांना सहाय्य करण्याच्या दृष्टीनं आणि विद्यार्थ्यांना कोरफड वनस्पतीचे फायदे समजावेत. निसर्गोपचारांबाबत लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी कोरफड लागवडीचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचंदेखील वाडेकर यांनी सांगितलं.