ETV Bharat / politics

लोहगाव विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं नाव; जाणून घ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील इतर निर्णय - Cabinet Decision

Cabinet Decision : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) तोंडावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे येथील लोहगाव विमानतळाचं (Lohgaon Airport) नाव आता बदलणार आहे.

Cabinet Decision
राज्य मंत्रिमंडळ (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2024, 8:46 PM IST

मुंबई Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीला (Assembly Election 2024) काही दिवस बाकी असताना महायुती सरकारकडून निर्णयाचा धडाका लावला जात आहे. दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

लोहगाव विमानतळाचं नामांतर : लोहगाव विमानतळाचं (Lohegaon Airport) नाव 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे' असं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच दूध अनुदान योजना सुरु राहणार आहे. दुध उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे 7 रुपयांचे अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळं दुध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया देताना मुरलीधर मोहोळ (ETV BHARAT Reporter)

पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण ‘जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असं करण्याच्या दृष्टीनं पहिले पाऊल आज पडले. आज राज्य सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मंजुरी दिली आहे. राज्य सरकाला मी मनापासून धन्यवाद देतो. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा नाव देण्यात यावं अशी विनंती केली होती. त्या विनंतीला प्रतिसाद देत आज झालेल्या कॅबिनेटमध्ये मान्यता देण्यात आली आहे. - मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्य मंत्री

केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार : संत तुकाराम महाराज यांचं आजोळ हे लोहगांव होत, त्यांचं बालपण तिथं गेलं आहे. तसेच संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तनात चार लोक हे लोहगाव येथील होते ते देखील टाळकरी म्हणून त्यांची साथ देत होते. म्हणून गेल्या अनेक वर्षापासूनची जी मागणी होती ती आज पूर्ण होत आहे. याचा खूप आनंद आहे तसेच आत्ता केंद्र सरकारकडे देखील याबाबत पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय कोणते?
- बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना.
- धान उत्पादकांना प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर मिळणार आहे.
- कुणबीच्या 3 पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश करण्याचा महत्त्वाच निर्णय.
- जुन्नर येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय उभारणार.
- शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग. १४८६ कोटीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
- करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा.
- यवतमाळ, जळगांव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते.
- क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेंना क्रीडा सुविधा उभारण्यासाठी मुंबईतील वांद्रे येथे भूखंड देण्यात येणार आहे.
- ग्रामविकास आणि ग्रामसेवक या अधिकारी पदांचे एकत्रिकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद निर्माण करण्यात येणार.
- हरित हायड्रोजन धोरणात आगामी काळात पारदर्शकता आणणार.
- एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करण्यात येणार असून, साठ वर्षाचा भाडेपट्टा करार करण्यात येणार आहे.
- ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे.
- वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ राजपूत समाजासाठी निर्माण करणार.
- गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा करण्यात आली.

हेही वाचा -

  1. महायुती, महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच; आजी-माजी नव्हे तर नवख्यांचीही नावं चर्चेत - Vidhan Sabha Election 2024
  2. आनंदाची बातमी! 'लाडक्या बहिणीं'चा तिसरा हप्ता 'या' दिवशी येणार - Ladki Bahin Yojana
  3. सरपंच, उपसरपंच यांच्या पगारात दुपटीने वाढ, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय - Sarpanch Salary hike

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.