ETV Bharat / politics

सुप्रिया सुळेंनी 'त्या' कार्यक्रमाला जायला नको होतं; मंत्री मुश्रीफांची समरजीत घाटगेंवर टीका - Hasan Mushrif

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Hasan Mushrif : राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. मुश्रीफ यांच्याकडून मुंबईमध्ये कागल गडहिंग्लज मतदारसंघातील लोकांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. दुसऱ्या बाजूला समरजिसिंह घाटगे यांनी सुद्धा पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, समरजीत घाटगे उपस्थित होते. यावरून मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Hasan Mushrif On supriya sule
हसन मुश्रीफ आणि सुप्रिया सुळे (संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूर Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघातील पुण्यात स्थायिक असलेल्या मतदारांचा रविवारी पिंपरी चिंचवड येथे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, समरजीत घाटगे उपस्थित होते. मात्र, खासदार सुळेंची उपस्थिती कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांना चांगलीच खटकली आहे.

समरजीत घाटगेवर टीका : सुप्रिया सुळे यांनी हxxखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला जायला नको होतं. तसेच त्यांनी आधी माहिती घ्यायला पाहिजे होती की, ईडीचं प्रकरण कुणामुळं झालं, अशी जोरदार टीका मंत्री मुश्रीफ यांनी समरजीत घाटगे यांचं नाव न घेता केलीय.

प्रतिक्रिया देताना आमदार हसन मुश्रीफ (ETV BHARAT Reporter)

विधानसभा तिन्ही पक्ष मिळून लढणार : उपमुख्यमंत्री अजित पवारांना जाणून-बुजून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आणि भाजपाकडून लक्ष केलं जात आहे. असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं. पण या वक्तव्यामध्ये काहीच तथ्य नाही, आम्ही विधानसभा तिन्ही पक्ष मिळून लढणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वेळोवेळी हे सांगितलं आहे. त्यामुळं ज्या काही बातम्या येत आहेत त्यात काही तथ्य नाही. तिन्ही नेते बैठकीला बसतील आणि त्यानंतर कुणाला किती जागा मिळतील हे ठरवलं जाईल असं मंत्री मुश्रीफ म्हणाले.

कागल गडहिंग्लज मतदार संघातील 20 हजार नागरिक मुंबईत राहतात. रविवारी याच लोकांचा मेळावा आमच्याकडून आयोजित करण्यात आला होता. यावेळी 3 हजार लोकांचं नियोजन केलं होतं, पण 5 ते 6 हजार नागरिक आले. मुंबईत राहणाऱ्या माझ्या भागातील नागरिकांनी मतदारसंघातील काम बघितली आहे. त्यामुळं इतका प्रतिसाद मिळाला. हसन मुश्रीफ,आमदार

कागलच्या राजकारणात चुरस वाढली : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवारांनी समरजीत घाटगे यांच्या पक्षप्रवेशाला उपस्थित राहून मंत्री मुश्रीफ यांना जो द्यायचा तो संदेश दिला. यानंतर कागलच्या राजकारणात चुरस निर्माण झाली आहे. एका बाजूला महायुती म्हणून मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे तर दुसऱ्या बाजूला तुतारी चिन्हावर समरजीत घाटगे हे मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान निर्माण करत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालकपदी संजय घाटगे यांची निवड करून, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार समरजीत घाटगे यांना घेरण्याचा प्रयत्न मंत्री मुश्रीफ आतापासूनच करत आहेत. यामुळं कागलच्या राजकारणात चुरस निर्माण झाली आहे.

हेही वाचा -

  1. साताऱ्यात दिसलं शरद पवारांचं 'जेम्स बॉन्ड' कनेक्शन; 'व्हीआयपी' नंबरच्या मर्सिडीजनं वेधलं लक्ष - Sharad Pawar Car Satara Visit
  2. इम्तियाज जलील शेकडो वाहनांसह मुंबईला रवाना, मुख्यमंत्र्यांना संविधानाची प्रत देत विचारणार 'हा' जाब - Chalo Mumbai Tiranga Rally
  3. विधानसभेच्या तयारीला लागा! केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा ठरला - Assembly Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.