'अंधेरीचा राजा'च्या विसर्जनावेळी तराफा बोट उलटली; दोघं जखमी - Andheri Ganpati Visarjan Accident - ANDHERI GANPATI VISARJAN ACCIDENT
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 23, 2024, 10:04 AM IST
मुंबई Andheri Ganpati Visarjan Accident : पश्चिम उपनगरातील नवसाला पावणारा मानाचा गणपती अशी ख्याती असलेल्या 'अंधेरीचा राजा'चं विसर्जन सुरू असताना मोठा दुर्घटना घडली. यावेळी मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जाणारी तराफा बोट समुद्रात अचानक उलटली. त्यामुळं मोठा गोंधळ उडाला. मात्र, सुदैवानं तराफा फार खोल समुद्रात गेला नसल्यानं बहुतांश गणेशभक्त पोहत किनाऱ्याला पोहोचले. तर काही जणांना स्थानिक कोळी बांधवांनी आपल्या बोटीच्या सहाय्यानं सुखरूप बाहेर काढलं. या घटनेत सिद्धी नायक (वय-17) आणि सचिन नायक (वय-46) हे दोघे जखमी झाली आहेत. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वर्सोवा चौपाटीवर ही दुर्घटना घडली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठं विघ्न टळले.