गोपीचंद पडळकर घोड्यावर स्वार, तर ‘लगाम’ मात्र महेश लांडगेंच्या हातात; पाहा व्हिडिओ - Gopichand Padalkar
🎬 Watch Now: Feature Video


Published : Nov 26, 2023, 12:54 PM IST
पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad News : गोवंश संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे अश्व आणि देशी गोवंश पशू प्रदर्शन भरविण्यात आलंय. या प्रदर्शनामध्ये अश्व आणि गोवंश पशू प्रदर्शन तसंच आरोग्य शिबीरासह एकूण 17 प्रकारातील पशूंच्या ‘रॅम्प वॉक’चं आयोजन करण्यात आलं आहे. प्रदर्शनात देशभरातून पशूपालकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करत सहभाग घेतला आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पुढाकारानं पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, मोशी येथे भव्य देशी गोवंश प्रदर्शन व पशु आरोग्य शिबीर भरविण्यात आला आहे. या प्रदर्शनाला शनिवारी (25 नोव्हेंबर) आमदार गोपीचंद पडळकर , समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी हजेरी लावली होती. गोपीचंद पडळकर यांनी यावेळी घोडेस्वारी करत आनंद घेतला. तर घोडेस्वारी करताना लगाम आमदार महेश लांडगे यांच्या हातात होता. आमदार महेश लांडगे यांना या याबद्दल विचारले असता, अहो आम्ही दोघं चांगले मित्र आहोत. लगाम माझ्या हातात आहे असं काही नाही, असं ते म्हणाले. तर यावेळी आमदार गोपीचंद पडळकरांनी माध्यमांशी बोलणं टाळलं.