Hanuman Chalisa Pathan : काँग्रेस नेत्यांचे अंधेरीच्या सिद्धिविनायक मंदिरात हनुमान चालीसा पठण - Hanuman Chalisa at Siddhivinayak Temple

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 14, 2023, 4:07 PM IST

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणूक विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत  आहे. आज काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील सिद्धिविनायक मंदिरात गणपती, हनुमानाला लाडूचा भोग चढवण्यात आला. यावेळी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, माजी खासदार संजय निरुपम, शिवसेना आमदार ऋतूजा लटके यांचा या कार्यक्रमात सहभाग होता. यावेळी काँग्रेस नेत्यांकडून सिद्धिविनायक मंदिरात हनुमान चालीसा पठण देखील करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हनुमान चालीसा पठण कार्यक्रमानंतर माजी खासदार संजय निरुपम यांनी बेस्ट बसमधील प्रवासी तसेच रिक्षामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लाडू वाटले. हनुमान चालीसा आम्ही आमच्या घरात किंवा मंदिरात देवासमोर बोलतो. आम्ही नाटक करत नाही ,आम्ही कोणाच्याही घरासमोर हनुमान चालीसा वाचत नाही असा टोला भाई जगताप यांनी भाजप खासदार नवननीत राणा यांना लगावला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.