Vidhan Parishad Election : पक्षानं दिलेल्या संधीचं सोनं करेल; भाई जगताप यांची 'ईटीव्ही भारत'ला प्रतिक्रिया - विधान परिषद काँग्रेस उमेदवार भाई जगताप चंद्रकांत हांडोरे
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - 20 जून होणार्या विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी काँग्रेसकडून मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भाई जगताप आणि काँग्रेसने चंद्रकांत हांडोरे यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसने भाई जगताप यांना तिसऱ्यांदा विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, के सी वेणुगोपाल, एच के पाटील आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आभार भाई जगताप यांनी मानले. पक्षाने दिलेल्या संधीचं सोनं करेल, अशी प्रतिक्रिया अर्ज भरल्यानंतर भाई जगताप यांनी दिली. काँग्रेसने पुन्हा एकदा चळवळीतल्या नेत्यांना विधानपरिषदेवर धाडले आहे. गेल्या काही वर्षात देशातलं वातावरण बिघडलं जात आहे. मात्र, राज्यांमध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षापासून महाविकास आघाडीचे सरकार आल्याने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगले असल्याचे भाई जगताप म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST