Shivendra Raje Bhosale News: समृद्धीच्या अपघातावरून राजकारण करणे योग्य नाही, अपघाताची चौकशी देखील झाली पाहिजे- शिवेंद्रराजे भोसले - Shivendra Raje Bhosale On various issues
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि भाजपकडून छत्रपतीचा मान सन्मान ठेवण्याचे सातत्याने काम केले जात आहे. महाराष्ट्रातही छत्रपतींसोबत सर्व महापूरूषांचा सन्मान ठेवला जात आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात राजकारणासाठी औरंगजेबाचे उद्दातीकरण केले जात असल्याची खंत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शिर्डीत व्यक्त केली आहे. राज्यात राजकारणासाठी हे करणे चुकीचे आहे. मुस्लिम बांधवही औरंगजेब आपल्या हिताचा होता, असे मानत नाहीत. महाराष्ट्राची ओळख छत्रपतींमुळे आहे आणि राहणार असून कोणी कितीही प्रयत्न केला तरी छत्रपतींना कमी लेखण्याचा डाव यशस्वी होवू देणार नाही, असा इशारा शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी दिला आहे. भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आज शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते, साईबाबांच्या दर्शनानंतर शिर्डीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. समृद्धी महामार्गावर झालेला अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी आहे. ज्या कुटुंबावर संकट कोसळले, त्या कुटुंबांना दुःखातून बाहेर पडण्याची ताकद साईबाबा देव अशी प्रार्थना यावेळी राजेंनी साई चरणी केली. मात्र समृद्धीच्या अपघातावरून राजकारण करणे योग्य नाही. फक्त रस्त्याला दोष देऊन चालणार नाही तर अपघातांची चौकशी देखील झाली पाहिजे, तसेच शासनाने योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात असेही यावेळी राजे म्हणाले आहे. राज्यात असलेल्या शिंदे - फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलल्या जात आहे. यावर बोलतांना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, मंत्रीपदाचा निर्णय पक्ष आणि देवेंद्र फडणवीस घेतील. देवेंद्रजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतील याची खात्री असल्याचे राजे म्हणाले आहे.