सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराजांची महायात्रा सुरू होण्याअगोदर सोलापुरात राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं (Solapur Agricultural Exhibition) आयोजन केलं जातं. यंदाच्या कृषी महोत्सवात दूध पिणारा कोंबडा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. सोलापूरकर आणि राज्यातील जनता पहिल्यांदाच कोंबडा दूध पिताना पाहात आहे. सर्वात मोठा 'राजा कोंबडा' (King Cock) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंबड्याचा खुराकही एखाद्या पैलवानाप्रमाणे आहे. रोज सकाळी मका भरडा, कोंबडी खाद्य, भुसा दिला जातो. तर दुपारी भुसा, तांदूळ, गहू, बाजरी हे धान्य दिलं जातं. कोंबड्याला संध्याकाळच्या खुराकात दूध, भुसा, कोंबडी खाद्य दिलं जातं. हा खुराक रोजचा असून त्यात खंड पडू दिला जात नाही, असं मालक यशराज घाडगे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं.
वाटीत दूध दिलं जातं : दिसायला वेगळा, उंच, धिप्पाड आणि तब्बल सहा किलो वजनाच्या राजा कोंबड्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. दुधाच्या बादलीत तोंड घालणं शक्य होत नाही. त्यामुळं त्याला रोज दूध वाटीत पिण्यासाठी ठेवण्यात येतं. तो बाकी कोंबड्यांपेक्षा वेगळा असल्यानं त्याला राजा असं नाव देण्यात आलं आहे. राजाला तब्बल 50 हजाराची मागणी आली. पण तो घरचा सदस्य झाला असून त्याला कितीही किंमत आली तरी विकणार नसल्याचं मालक यशराज घाडगे यांनी सांगितलं.
उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना जोडधंदा : वनराज क्रॉस जातीचा राजा कोंबड्याचं वजन एक वर्षात सहा किलो झालं आहे. इतर कोंबड्यांपेक्षा जास्त वजन वाढल्यानं शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसायात जोडधंदा म्हणून अधिक फायदेशीर आहे. पोल्ट्री फॉर्मचा व्यवसाय करणाऱ्या शेतकरी बांधवांनी अशा जातवान कोंबड्याचा व्यवसाय केल्यास जास्त नफा मिळू शकतो. कोंबड्याचे मालक यश घाडगे हे बारामती (पुणे) येथील आहेत. अशा जातिवंत कोंबड्याचं उत्पादन वाढवून विक्रीसाठी उपलब्ध करणार असल्याची माहिती, यश घाडगे यांनी दिली.
कोंबड्याला दारूचे व्यसन : याआधीही भंडाऱ्यात चक्क एका कोंबड्याला दारूडा कोंबडा पाहण्यास मिळाला होता. हा कोंबडा दारू घेतल्याशिवाय अन्नाचा कणही घेत नव्हता. भंडारा जिल्ह्यातील पिपरी पुनर्वसन गावातील भाऊ कातोरे यांनी हा कोंबडा पाळला आहे. सोलापूरच्या प्रदर्शनात मात्र दूध पिणारा कोंबडा आला आहे.
हेही वाचा -