मुंबई : 'स्त्री 2'च्या निर्मात्यांनी नुकतीच नवीन 'परम सुंदरी' चित्रपटाची घोषणा केली आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर रोमान्स करताना रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. आता सोशल मीडियावर चित्रपटाचे मोशन पोस्टर व्हायरल झाले आहे. या पोस्टरवरून अंदाज लावला जाऊ शकतो की, हा चित्रपट केरळ, दक्षिण भारतावर आधारित असेल. मॅडॉक फिल्म्स या नव्या जोडीबरोबर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाका करणार आहे.
'परम सुंदरी' होईल या दिवशी प्रदर्शित : मोशन पोस्टर शेअर करताना, मॅडॉक फिल्म्सनं लिहिलं, 'नॉर्थचा स्वॅग, साऊथचा ग्रेस, दोन जग टक्कर घेतात आणि चमकतात. दिनेश विजन तुषार जलोटा प्रस्तुत 'परम सुंदरी', प्रेमकहाणी 25 जुलै 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे.' दरम्यान जान्हवी कपूरचे पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिलं, 'जान्हवी कपूरची ओळख साऊथची सुंदरी म्हणून करत आहोत, तुमचे मन वितळण्यास तयार आहे.' दुसरीकडे सिद्धार्थचे वेगळे पोस्टर शेअर करताना त्यांनी लिहिलं, 'सिद्धार्थ मल्होत्रा नॉर्थच्या मुंडा परमची ओळख करून देत आहोत, तो आपल्या मोहकतेनं तुमची मनं जिंकण्यासाठी तयार आहे.' मॅडॉक फिल्म्सच्या या घोषणेनं चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. या पोस्टरच्या पोस्टमध्ये आता अनेक कमेंट्स करत आहेत.
'परम सुंदरी' चित्रपटात असेल प्रेमकहाणी : केरळच्या बॅकवॉटरमध्ये आधारित, परम सुंदरी' एक सुंदर प्रेमकहाणी असणार आहे. या चित्रपटामध्ये दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक प्रेमात पडतात. निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट कॉमेडी, प्रेम आणि भावनांचा रोलर कोस्टर राईड असेल. याशिवाय चित्रपटाबद्दल आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, 'प्रेमाची हृदयस्पर्शी कहाणी, जिथे दोन जगे टक्कर घेतात आणि ठिणग्या उडतात.' मॅडॉक फिल्म्सनं 2024 मध्ये अनेक वेगवेगळ्या शैलीतील चित्रपटांसह चमकदार कामगिरी केली आहे. यात ब्लॉकबस्टर सायन्स-फिक्शन रोमँटिक कॉमेडी' तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटाचा समावेश आहे. याशिवाय यात हॉरर-कॉमेडी 'मुंज्या', 'स्त्री'चा सीक्वेल 'स्त्री 2' आणि 'सेक्टर 36' देखील आहेत.
हेही वाचा :
- 'पुष्पा 2' हाही सिनेमा आहे', म्हणत ट्रोल करणाऱ्यांवर भडकली जान्हवी कपूर
- जान्हवी कपूरनं श्रीदेवीच्या जन्मदिनानिमित्त तिरुपती मंदिराला दिली भेट, शिखर पहारियाबरोबरचा व्हिडिओ व्हायरल - Janhvi Kapoor
- ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर स्टारर 'देवरा पार्ट 1'मधील 'धीरे धीरे' गाणं रिलीजसाठी सज्ज - devera part 1