Kirit Somaiya News: छत्रपती संभाजीनगर दंगलीवरुन सोमैयांचा राऊत-पवार-ठाकरेंसह राहुल गांधींवर निशाणा, ऐका काय म्हणाले... - किरीट सोमैय्या
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी भेट देत सांत्वन केले. यावेळी ते म्हणाले की, भारतीय जन संघातील ही शेवटची पिढी होती, असे म्हणायला हरकत नाही. भारतीय जनता पक्षातील नवीन पिढीने खासदार गिरीश बापट यांच्याकडून काही शिकले पाहिजे. बापट हे फक्त लढवय्या नव्हे, तर अन्यायाच्या विरोधात लढणारे नेते होते. त्यांच्या राजकीय कार्याची सुरवात ही आणीबाणीनंतर झाली. अनेक आठवणींना यावेळी त्यांनी उजाळा दिला. बुधवारी रात्री छत्रपती संभाजी नगर येथे दोन गटात हाणामारी झाली आहे. आज रामनवमी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी आत्ता भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, संजय राऊत म्हणत होते की, आत्ता दंगली सुरू होतील. या त्याच तर दंगली नाहीत ना. म्हणजेच संजय राऊत असे म्हणत होते की, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावतीने जे सांगत होते, ही तीच तर दंगल नाही ना? असा सवाल यावेळी किरीट सोमैय्या यांनी उपस्थित केला आहे.