भारताच्या पराभवानंतर संतप्त क्रिकेटप्रेमींनी फोडला टीव्ही; अलिगडमधील घटना - Australia beat India by 6 wickets

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 7:51 AM IST

अलिगड Australia beat india in world cup : दोन वेळचा विजेता भारत आणि पाच वेळचा विजेता ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी (19 नोव्हेंबर) विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 गडी राखून दणदणीत पराभव केला. दरम्यान, भारताच्या पराभवानंतर क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा बघायला मिळत आहे.  काही ठिकाणी लोकं संतप्त होऊन भारतीय संघाविरोधात घोषणाबाजी करत आहेत. असाच काहीसा प्रकार अलिगढमध्ये रघुवीरपुरी येथे घडला आहे. रघुवीरपुरी येथील काही क्रिकेटप्रेमींनी भारताच्या पराभवानंतर संतप्त होऊन भररस्त्यात टीव्ही फोडला. या प्रकरणी रघुवीरपुरी येथील रहिवासी असलेल्या सचिननं सांगितलं की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना खूप रोमांचक होता.  पण तो जिंकू शकला नाही हे भारताचं दुर्दैव आहे. भारताच्या पराभवामुळं आम्ही फार निराश झालोय. त्यामुळं आम्ही टीव्ही फोडला. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.