महासंकल्प मेळावा म्हणजे तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार, अतुल लोंढे - Atul Londhen criticize government
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई दिवाळीच्या दरम्यान महाराष्ट्र शासनाने 19000 पोलीस भरती जाहीर केली आणि दोनच दिवसात ती भरती स्थगित police recruitment Suspension केली. यामुळे राज्यात असंतोष पेटलेला आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शासनाच्या या मेळाव्यावर खरपूस टीका केली Atul Londhen criticize government आहे. राज्यातील बेरोजगारीला कारणीभूत आहे राज्याचे मोठे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. त्यामुळे हे शासन ही सगळी बाब लपवण्याचा प्रयत्न करीत आहे असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनाने वर्षभरात 75000 बेरोजगार व्यक्तींना रोजगार देण्याचा महासंकल्प मेळावा घेतला. त्यात 2000 व्यक्तींना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रे देखील दिली गेली. मात्र काँग्रेसने हा मेळावा म्हणजे बेरोजगारांच्या जखमेवर हा मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे म्हटले Congress Melava rubbing salt on injury like unemployment आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST