Bharat Jodo yatra : भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या मुक्कामासाठी वातानुकूलित मंडपाची व्यवस्था... - Arrangement of ac mandap for Rahul Gandhi
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड : काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांची भारत जोडो यात्रा सध्या नांदेड जिल्ह्यात ( Bharat Jodo Yatra in Nanded ) आहे. कन्याकुमारी ते जम्मू काश्मीरपर्यंत ही यात्रा जाणार आहे. या यात्रेला ठिकठिकाणी चांगक प्रतिसाद मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात देखील या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान राहुल गांधी यांच्या मुक्कामासाठी वातानुकूलित मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात वातानुकूलित रूम्स, त्याच बरोबर बाथरूमची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत १२० यात्री आहेत. हे यात्री कन्याकुमारी पासून राहुल गांधी यांच्यासोबत पायी चालत आहेत. या १२० यात्रीसाठी देखील वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. भव्य मंडप,या मंडपात गादी, पलंग फॅनची सोय करण्यात आली आहे. राहुल गांधी यांचा ज्या ठिकाणी मुक्काम असणार आहे. त्या ठिकाणी अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात ही यात्रा चार दिवस असणार आहे. सोमवारी देगलूर येथे पहिला दिवस आटोपुन आज मंगळवारी ही यात्रा बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे मुक्कामी असणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST