मुंबई - सिनेमाच्या पडद्यावर आजपर्यंत अनेक प्रेमकथा आपण पाहिल्या असतील. पुस्तकातूनही अशा सुंदर प्रेमकथा वाचल्या असतील. परंतु आज आम्ही तुम्हाला पडद्यावरच्या 'हिरो नंबर वन'ची खऱ्या खुऱ्या आयुष्यातील प्रेमकथा सांगणार आहोत. हा हिरो दुसरा तिसरा कोणी नसून गोविंदा आहे.
गोविंदा-सुनीताची प्रेमकहाणी - गोविंदाची पत्नी सुनीता आहुजानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिच्या बहिणीचं लग्न गोविंदाच्या मामाशी झालं होते. गोविंदाचा मामा आनंद हे चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक होते. त्यावेळी सुनिता फक्त नववीत शिकत होती. याच लग्नात तिनं गोविंदाला पहिल्यांदा पाहिले, तर गोविंदा त्यावेळी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होता. सुनीताच्या जीजूनं म्हणजेच निर्माता आनंद यांनी तिला गोविंदाबद्दल सांगितलं होते की तो खूप साधा माणूस आहे. सुनीताचा जीजू असलेल्या आनंद यांनी दोघांनाही 'तन बदन' हा चित्रपट ऑफर केला पण सुनीताने तो नाकारला. त्यानंतर सुनीता या चित्रपटाच्या सेटवर गोविंदाला भेटायला येत असे आणि इथेच दोघंही एकमेकांना डेट करू लागले.
गोविंदा आणि सुनीताचं भांडण आणि प्रेम - सुरुवातीला गोविंदा आणि सुनीता एकमेकांना आवडत नव्हते. त्यांचे विचार जुळत नव्हते आणि म्हणूनच त्यांच्यात अनेकदा भांडणं झाली पण त्यांच्यात एक गोष्ट समान होती ती म्हणजे दोघांनाही नृत्याची आवड होती. दोघेही अनेकदा फॅमिली फंक्शन्समध्ये नाचत असत. सुनीतानं एकदा खुलासा केला होता की तिनं गोविंदाला नाचायला शिकवलं होतं.
आईनं पकडलं होतं प्रेमपत्र - भांडण असूनही गोविंदा आणि सुनिता एकमेकांवर प्रेम करू लागले होते. त्यानंतर,डेटिंग करताना, दोघांनी एकमेकांना चोरून प्रेमपत्रं लिहिली. पण एके दिवशी हे प्रेमपत्र गोविंदाच्या आईपर्यंत पोहोचलं आणि त्याच्या कुटुंबातील सर्वांना त्यांच्याबद्दल माहिती झाली. त्यानंतर, सर्वांच्या संमतीने, दोघांचंही लग्न ११ मार्च १९८७ रोजी झालं. सुनीता आणि गोविंदा यांना यश आणि टीना ही दोन मुलं आहेत.
हेही वाचा -