जुन्नर येथून शेतकरी 'आक्रोश' मोर्चाला सुरवात; सरसकट कर्जमाफीची मागणी - Amol kolhe
🎬 Watch Now: Feature Video


Published : Dec 27, 2023, 2:24 PM IST
पुणे : Amol kolhe Farmers protest march राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तीन दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारला जाब विचारणारा जागर चालणार आहे. गुरुवारी शिवनेरी-जुन्नर येथून शेतकरी 'आक्रोश' मोर्चाला सुरुवात झाली आहे. जुन्नर मधील शिवनेरी किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला आहे. कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवावी. दूध उत्पादक शेतकऱ्यांना कोणताही भेद न करता अनुदान देण्यात यावे. पीक विमा कंपनीची मनमानी थांबवून तातडीने नुकसान भरपाई मिळावी. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज धोरण लागू करावे या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी 'आक्रोश' मोर्चा काढला जात आहे. शिवनेरी जुन्नर येथून निघालेला 'आक्रोश' मोर्चा ओतूर येथे येईल. तिथे पदयात्रा होईल. पुढे आळेफाटा येथे सभा होणार आहे. नारायणगाव येथे देखील पदयात्रा आणि सभा होईल. दुपारनंतर कळंब येथे पदयात्रा होईल. त्यानंतर मंचर आणि राजगुरूनगर येथे देखील सभा होतील. शेतकरी 'आक्रोश' मोर्चाच्या पहिल्या दिवसाचा शेवट चाकण येथील मशाल मोर्चाने होईल. हा मोर्चा पुढे केंदूर येथे जाईल.