MLA Mufti Mohammad On Yogi Adityanath : तुम्ही भारतातील मुस्लिमांना घाबरवू शकत नाही, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल आक्रमक - आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. मात्र त्याचे पडसाद आता चांगलेच उमटत आहेत. एमआयएमचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल ए खलिक यांनीही यावर चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रत्येकाला उत्तर प्रदेशातील परिस्थिती माहीत असून नागरिक कायदा हातात घेत असल्याचा आरोप आमदार मुफ्ती मोहम्मद खलिक यांनी केला आहे. आम्ही कोणत्याही गुन्हेगाराचे समर्थन करत नाही. परंतु अतिक अहमद आणि अश्रफ यांच्या मारेकऱ्यांना कायद्याच्या कक्षेत राहून शिक्षा देण्याची मागणी आमदार मुफ्ती मोहम्मद खलिक यांनी केली आहे. कायद्याला बगल देऊन निर्णय घेतल्यास तुम्ही हुकूमशाही चालवत आहात असे म्हणता येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. अशी हुकूमशाही तुमच्यासाठी आणि देशासाठी योग्य नाही. 2 - 4 जणांना मारून तुम्ही भारतातील तमाम मुस्लिमांना घाबरवू शकाल, असे वाटत असेल, तर हे वेड्याचे स्वप्न आहे. ते स्वप्न कधीच पूर्ण होणार नसल्याचा टोलाही त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव न घेता लगावला.