Aaditya Thackeray : आमच्यासोबत गद्दारी केली मात्र, शेतकऱ्यांसोबत करु नका; आदित्य ठाकरेंची 'ईटीव्ही'ला प्रतिक्रिया - Aditya Thackeray Pune Visit
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) आज नाशिक तसेच पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर ( Aditya Thackeray on Pune tour ) होते. या दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद ( Aditya Thackeray interacted with farmers ) साधला. तसेच यावेळी शिरूर तालुक्यातील वाघाळे गावात जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्याशी बातचीत करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. हे जे घटना बाह्य सरकार आहे. त्यांनी आमच्या बरोबर जी गद्दारी केली आहे. ती गद्दारी शेतकऱ्यांबरोबर करू नये. सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांना मदत केली ( Aditya Thackeray's demand to help farmers ) पाहिजे असे देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितल.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST