टिंबर मार्केट येथे लाकूड सामान असलेल्या गोडाऊनला लागली भीषण आग - टिंबर मार्केटला आग लागली

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 25, 2023, 9:04 AM IST

पुणे : पुण्यातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केट येथे लाकूड सामान असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली असून आग अद्याप सुरु असून शेजारील चार घरांना ही या आगीची झळ पोहचली आहे.अग्निशामक दलाचे जवानांनी प्रथमत आग वस्तीमधे व शेजारील शाळेमध्ये पसरु न दिल्याने व सुमारे १० सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा धोका टळला आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत अद्यापही कोणीही जखमी वा जिवितहानी झालेली नाही. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर २० अधिकारी व जवळपास १०० जवान आणि पुणेमनपा- पुणेकॅन्टोमेंट-पीएमआरडीए-पिंपरीचिंचवड अग्निशमन दल अशी एकुण जवळपास ३० अग्निशमन वाहने व खाजगी वॉटर टँकर दाखल आहेत.आग विझविण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा - 

  1. Fire Break Out In Chembur : चेंबूरमध्ये आगीचे तांडव, स्वस्तिक चेंबरच्या चौथ्या मजल्यावर लागली आग
  2. PM Modi Returns To India : तीन देशाचा दौरा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले, भाजपने केले जंगी स्वागत
  3. HSC Results 2023 : विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली; गुरुवारी बारावीचा निकाल, 'असा' करा चेक

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.