Fire At Nalasopara: नालासोपारा येथे भीषण आग; अग्नीशमन दलाचे 2 जवान जखमी - नालासोपारा येथे भीषण आग लागल्याची घटना
🎬 Watch Now: Feature Video
पालघर : नालासोपारा येथे भीषण आग लागल्याची घटना घडली. नालासोपारा पूर्वेकडील अंबरनाथ लपासी यांच्या पंचम पॅलेस बी. विंग रूम नंबर 207 मध्ये तीन वाजून 39 मिनिटांनी भीषण आग लागली. माहिती मिळताच घटनास्थळी तीन वाजून 40 मिनिटांनी अग्निशमन वाहन रवाना झाले होते. तीन वाजून 45 मिनिटांनी गाडी घटनास्थळी पोहोचली होती. बिल्डिंगमधील सर्व लोक बाहेर आले होते. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी फायरमन राहुल पाटील व कुणाल तामोरे पाहणी करण्याकरिता रूममध्ये दाखल झाले. त्याचक्षणी जळत असलेल्या आगीमध्ये असलेला सिलेंडरचा स्फोट झाला. आगीच्या बॅक ड्रॉपमुळे दोघे जवान होरपळले आहेत. दोघांनी पिपीई किट घातली असल्यामुळे ते वाचले आहेत. राहुल 22 टक्के भाजले असून कुणाल 12 टक्के भाजले आहेत. त्यांना ओझोन हॉस्पिटल येथे पुढील उपचाराकरिता रवाना करण्यात आले. त्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांनी आगीवर चार वाजून 45 मिनिटांनी नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने या घरात कोणी नसल्याने अनर्थ टळला, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांच्या जीवावर आलेले हातावर निभावले आहे. आग विझल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ही अत्यंत भीषण आग होती.