Pune Accident : रस्ते अपघाताच्या बाबतीत रुग्णवाहिका पोहचण्याची वेळ सरासरी 18.54 मिनिटे.. पाहा व्हिडीओ.. - रुग्णवाहिका सेवेचा सरासरी प्रतिसाद वेळ पुणे
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : रविवारी पुण्यातील नवले ब्रिजवर एका कंटेनरने 47 गाड्यांना उडवले असताना आज पुन्हा एकदा पुण्यातील नवले पुलावर अपघात झाला Pune Accident आहे. हा अपघात झाला असताना 2 तासात पुन्हा याच ठिकाणी अपघात झाला आहे. गेल्या चार दिवसात याच नवले पुलावर 3 अपघात तर 52 गाड्यांचे नुकसान झाले आहे. रविवारी जेव्हा अपघात झाला तेव्हा या अपघातात दहा जण जखमी होते. तेव्हा 11 मिनिटांच्या आत अपघातग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी एकूण 3 रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या होत्या. पुणे जिल्ह्यासाठी गेल्या 3 महिन्यांतील 108 रुग्णवाहिका सेवेचा सरासरी प्रतिसाद वेळ रस्ता अपघाताच्या बाबतीत 18.54 मिनिटे 18.54 minutes average आहे. आणि हे समाधान कारक असून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येत आहे. जिल्ह्यात या वर्षभरात एकूणच किती अपघात झाले तसेच किती वेळात अत्यावश्यक रुग्णसेवा पुरविली गेली आहे, याची सरासरी याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी खास बातचीत केली आहे.पाहूयात..
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST