Goa Assembly Special Session : विधानसभेत आमदारांची दुचाकीवरून एन्ट्री; ट्रॅफिक समस्येवर लक्ष वेधण्यासाठी आमदारांची शक्कल - Goa Assembly Session

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 16, 2022, 12:51 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

पणजी (गोवा) - गोवा विधानसभेचे विशेष अधिवेशन ( Goa Assembly Special Session ) मंगळवारी बोलावण्यात आले होते. यावेळी आमदारांना शपथ देण्यात आली. यावेळी कोर्टालीम आणि सात आंद्रेच्या आमदारांनी विधानसभेत दुचाकीवरून प्रवास करून राज्यातील ट्रॅफिक समस्येवर पहिल्याच दिवशी ( MLAs draw attention to traffic problem ) वाचा फोडली. यावेळी कोर्टालीमचे आमदार आपल्या दुचाकीवरून विधानसभा परिसरात दाखल ( MLA enter Goa Assembly on Bike ) झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार आंतोन वाझ्झ म्हणाले, की माझ्या मतदारसंघातून पणजी शहरात येताना कुट्टहाळी पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण दुचाकीवरून प्रवास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या राजकारणात प्रादेशिक अस्मितेवरून रान माजवणाऱ्या स्थानिक पक्ष आरजीचे आमदार विरेश बोरकर निवडून आला आहे, भविष्यात आपली हवा विधानसभेत करण्यासाठी या पक्षाचे प्रमुख मनोज परब आणि विरेश बोरकर यांनी बुलेट वरून विधानसभा परिसरात प्रवेश करून आपणही विधानसभेत लोकांच्या प्रश्नांविषयी आवाज उठविण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.