VIDEO : मला खासदार बनवण्यात सत्तार यांचा मोठा वाटा : इम्तियाज जलील - इम्तियाज जलील अब्दुल सत्तार बातमी
🎬 Watch Now: Feature Video
वैजापूर (औरंगाबाद) : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मला खासदार करण्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Minister Abdul Sattar ) यांचा मोठा वाटा असल्याचे वक्तव्य इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ) यांनी केले. मंत्री सत्तार आणि इम्तियाज जलील वैजापूर येथील एका उद्घाटना कार्यक्रमा साठी एकत्रित आले होते. जलील यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. सत्तार हे मंत्रीपेक्षा महाराष्ट्राचे राजकारणातील किंग मेकर आहेत. सत्तार हे असे नेते आहेत, ज्याला बनवायचं त्याला बनवू शकतात ज्याला डुबवायचं त्याला डुबवू शकतात. मी आज खासदार आहे ते आता जरी शिवसेनेत असले तरी मात्र मला खासदार बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, असे खासदार जलील म्हणाले. पाहा, व्हिडिओ.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST