विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात नयनरम्य फुलांची आरास, परत-परत ऐकावे असे संथ लईत वाजणारं संगीत - Vitthal Rukmini temple
🎬 Watch Now: Feature Video

पंढरपुरमध्ये विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात सुंदर आरास तयार करण्यात आली आहे. श्री. विठ्ठल रुक्मिणी मातेला मनमोहक पोशाख व अलंकार परिधान केले होते. श्रीसंत नामदेव पायरी, सोळखांबीला नयनरम्य अशी फुलाची सजावट केली होती. यामध्ये झेंडू, शेवंती, गुलछडी, ऑरकेड, गुलाब, ब्लू, कामिनी फुलांसह सजवण्यासाठी दोन टन फुलांचा वापर केला आहे. कोण्याही व्यक्तीला परत-परत पाहण्याचा मोह व्हावा अशी ही प्रसंन्न करणारी सजावट आणि विठ्ठलाच रुप दिसत आहे. दरम्यान, या सजावटीबरोबर कित्येकवेळ ऐकत बसाव अस संथ संगित वाजत आहे.