प्रभासच्या चाहत्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा हैदराबादमध्ये लाठीचार्ज - प्रभास फॅन्सवर पोलिसांचा लाठीचार्ज
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 22, 2023, 12:21 PM IST
हैदराबाद - Police lathi charge on Prabhas fans : प्रभास स्टारर 'सालार भार 1 सीझफायर' चित्रपटाला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळतोय. याला प्रभासचं मूळ गाव असलेलं हैदराबाद अपवाद असू शकत नाही. 22 डिसेंबर रोजी चाहत्यांनी थिएटर बाहेर प्रचंड गर्दी केल्याचं चित्र शहरात जागोजागी दिसत होतं. सिंगल स्क्रिनमध्ये पहाटे 1 वाजता सालारचे शो सुरू झाले. त्यामुळे रात्रीपासूनचं गर्दी ओसंडून वाहात होती. प्रभासच्या चाहत्यांचा असलेला जोश नियंत्रणात ठेवणं पोलीस अधिकाऱ्यांना अडचणीच ठरत होतं.
'सालार'च्या रिलीजच्या निमित्तानं चाहत्यांनी आरटीसी क्रॉस रोड रोड, हैदराबाद येथील प्रसिद्ध संध्या थिएटरमध्ये मैफिलीप्रमाणेच सार्वजनिक उत्सवाची व्यवस्था केली होती. गर्दी इतकी मोठी होती की रस्त्यावर वाहनेही जाणे अडचणीचे बनले होते. पोलिसांनी मोठा जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्याचा निर्णय घेतला. यामुळे थिएटर परिसराबाहेर गोंधळ उडाला होता.
हेही वाचा -