Former CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी घेतले बाबा महाकालचे दर्शन; संजय राऊतांना दिला 'हा' सल्ला - देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सल्ला
🎬 Watch Now: Feature Video
उज्जैन: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Former CM Devendra Fadnavis ) मंगळवारी बाबा महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला आले होते. फडणवीस हे भाजप कार्यकर्त्यांसोबत दर्शन घेण्यासाठी आले होते. महाकाल मंदिराच्या गर्भगृहात प्रार्थना करून त्यांनी बाबा महाकाल यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांनाही सल्ला दिला. ईडीने जप्त केलेल्या संजय राऊत यांच्या संपत्तीवर निशाणा साधत फडणवीस म्हणाले की, महाकालचा आशीर्वाद घेऊन सर्वांनी चांगले काम करावे. या अगोदर देवेंद्र फडणवीस फेब्रुवारी 2020 मध्ये महाकालच्या दर्शनासाठी आले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST