CCTV : चिखली शहरात दुकान मालकाचा खून - crime in chikhali, buldana
🎬 Watch Now: Feature Video
बुलडाणा :- जिल्ह्यातील चिखली शहराच्या जयस्तंभ चौकातील आनंद इलेक्ट्रॉनिक दुकानात मंगळवारी रात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकून हल्ल्यात दुकान मालक कमलेश पोपट वय 55 वर्ष यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यासह चिखली शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट यांनी रात्री 10 वाजताच्या सुमारास आपल्या दुकानाचा मुख्य शटर बंद केले. व बाजूचा लहान शटर उघडा असतांना एका दुचाकीवर तीन दरोडेखोर आले. त्यातील दोन जण आत ग्राहक बनून दुकानात घुसले व त्यांनी कमलेश पोपट यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन रोख रक्कम लुटली. त्यात कमलेश पोपट गंभीर जखमी झाले त्यांना खाजगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपास सुरू केला आहे.