पंतप्रधानांनी मराठा आरक्षणात हस्तक्षेप करुन निर्णय घ्यावा - संजय राऊत
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - केंद्र सरकार हे राज्यांचे पालक आहे. आमच्या राज्यांच्या समस्या आम्ही केंद्राकडेच सांगणार. त्यामुळे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व दोन प्रमुख सहकारी राज्याला मदत मिळावी यासाठी पंतप्रधांनांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. या चर्चेत मोदींनी सर्व प्रश्न समजावून घेतले. यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचाही समावेश आहे. मला खात्री आहे की, ज्यापद्धतीने त्यांनी सगळे एकून घेतले त्याच पद्धतीने ते कारवाई सुध्दा करतील. असे शिवसेना नेते संजय राऊत पत्रकारांशी बोलतांना म्हणाले. तसेच मराठा आरक्षणाचा विषय सर्व पक्षांनी एकत्र येऊन सोडवायला पाहिजे. मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळू नये, म्हणून मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला गेले होते. पंतप्रधान मोदींनी यात हस्तक्षेप करावा व सर्वोच्च न्यायालयाच्या मते त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, त्यांनी त्याचा वापर करावा, असेही ते म्हणाले. तसेच त्यांना उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याविषयी विचारले असता पक्ष वाढवणे गरजेचे आहे, त्यासाठी माझा दौरा सुरू आहे, इतर गोष्टी होत राहतील, असे ते म्हणाले आहे.