ऑक्सिजन टँकर पोलीस बंदोबस्तात पुण्यातून रवाना - Pune Oxygen Shortage
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - सध्या राज्यात ऑक्सिजन वरून राजकारण पेटले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात चाकण औद्योगिक क्षेत्रात ऑक्सिजन तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. मात्र तरीही पुणे जिल्ह्यात ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. हाच ऑक्सिजनचा पुरवठा नगर जिल्ह्यात नेत असताना पुणे जिल्ह्यच्या हद्दीत शिक्रापूर येथे पुणे जिल्हाधिकारी यांनी हे टँकर दोन दिवसांपुर्वी रात्रीच्या वेळी अडविले होते. मात्र त्यावेळी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व अहमदनगर जिल्हा प्रशासन यांच्या मध्ये चांगलाच वाद रंगला होता. शेवटी मुख्यमंत्र्यांना मध्यस्ती करून हा वाद मिटवावा लागला, असे बोलले जात आहे. पुणे जिल्ह्याला ऑक्सिजन कमी पडत आहे. त्यामुळे पहिल्यांदा पुणे जिल्ह्याला ऑक्सिजन मिळावे, अशी भूमिका जिल्ह्यातील काही स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाला चाकण येथून ऑक्सिजन चे टँकर पोलीस संरक्षणामध्ये नाशिक कडे रवाना करावे लागेल आहेत.