Nawab Malik on Tipu Sultan Controversy : 'टिपू सुलतान यांच्यावरून भाजपने सुरु केलेला वाद दिशाभूल करणारा' - नवाब मलिक टिपू सुलतान
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - 'टिपू सुलतान (Tipu Sultan Controversy) हे स्वतंत्र सेनानी होते. इंग्रजांशी लढा देताना ते शहीद झाले. मात्र त्यांच्या नावावरून भारतीय जनता पक्ष जो वाद उभा करतोय तो दिशाभूल करणार आहे. मलादेखील क्रीडांगणला टिपू सुलतान यांचे नाव देण्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने विरोध दर्शवला आहे. भारतीय जनता पक्षाने उभा केलेला हा वाद म्हणजे लोकांची दिशाभूल करणारा आहे..' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik on Tipu Sultan Controversy) यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला. टिपू सुलतान यांनी इंग्रजांसमोर कधीही शरणागती पत्करली नाही. इंग्रज साम्राज्याशी लढा देताना ते शाहिद झाले. टिपू सुलतान स्वतंत्रता सैनानी होते. मात्र आशा व्यक्तीच्या नावाला भारतीय जनता पक्षाकडून विरोध केला जातोय. कर्नाटक राज्यातही भाजप नेते येडुरअप्पा यांनी टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध केला होता. मात्र कर्नाटकात तेथे सत्तेवर येण्या आधी टिपू सुलतान यांची जयंती भाजप साजरी करत होती. त्याच प्रकारे मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकांनी रस्त्याला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात यावे यासाठी पत्र व्यवहार करत होते. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेत संयुक्त सभागृहात टिपू सुलतान बाबत दिलेली माहिती भारतीय जनता पक्ष विसरला का? असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.