लोकल सर्वसामान्यांसाठी बंद! आजपासून निर्बंध लागू.. - मुंबई लोकल
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे राज्य सरकारनं काही कठोर निर्बंध राज्यात लागू केले आहेत. एक मेपर्यंत राज्यात नियमांसह लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लोकल ट्रेन, मोनो, मेट्रो यांमधून सामान्य लोकांना प्रवास करण्यास बंदी करण्यात आली आहे. दादर स्थानक येथे सेंट्रल आणि वेस्टन अशा दोन लोकल लाईन आहेत या स्थानकातून दररोज लाखोंच्या संख्येने मुंबईकर प्रवास करत असतात. मात्र आता यातून त्यांना प्रवास करता येणार नाही. दादर स्थानकाच्या प्रवेशद्वारावर रेल्वेचे कर्मचारी उभे आहेत. जी आर पी चे कर्मचारी उभे आहेत. ते नागरिकांचे आयडेंटी कार्ड तपासत आहेत. जर नागरिक अत्यावश्यक सेवेत मोडणारा नसेल, तर त्याला लोकल मध्ये प्रवेश नाकारला जातो. तसंच स्थानकामध्ये देखील प्रवेश नाकारला जातोय. याचा आढावा घेतलाय ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी..